८ तासांत गायब मुलांचा शोध; कुरार पोलिसांनी दाखवली तत्परता

अलीम इनामदार,मुंबई :

कुरार पोलीस ठाण्याने तीन अल्पवयीन मुलांचा अवघ्या ८ तासांत शोध घेऊन त्यांना सुरक्षितपणे त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले आहे. या तत्पर कारवाईमुळे पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी श्री. त्रिनाथ कुमार नाथ (वय ४४ वर्षे) यांनी २७ मार्च २०२६ रोजी कुरार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यांचा मुलगा कु. रूद त्रिनाय नाथ (वय १३ वर्षे) व त्याचे दोन मित्र कु. जय जितेंद्र विश्वकर्मा आणि कु. सुमीत शैलेन्द्र कुमार वर्मा (दोघेही वय १३ वर्षे) हे सकाळी सेंट जॉर्ज स्कूल, कुरारगाव येथे गेले होते. मात्र अपेक्षित वेळेत घरी परत न आल्याने अपहरणाची शंका व्यक्त करण्यात आली.

या प्रकरणी कुरार पोलिसांनी गुन्हा नोंद करून तात्काळ तपास सुरू केला. शाळेतील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले तसेच तांत्रिक व पारंपरिक पद्धतींचा वापर करून शोधमोहीम राबविण्यात आली.

तपासादरम्यान संबंधित तीनही मुले मुलुंड रेल्वे स्टेशन परिसरात सुरक्षित अवस्थेत आढळून आली. त्यानंतर मुलांचे व पालकांचे जबाब नोंदवण्यात आले. कोणतीही संशयास्पद बाब आढळून न आल्याने मुलांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.

ही कामगिरी पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली कुरार पोलीस ठाण्याच्या मिसिंग पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.

 

कुरार पोलिसांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला असून नागरिकांकडून पोलिसांचे कौतुक करण्यात येत आहे।

 

सदरची कामगिरी मा.श्री. देवेन भारती, पोलीस आयुक्त बृहन्मुंबई, मा.श्री. सत्यनारायण चौधरी, सह पोलीस आयक्त (का.व यु.), मा.श्री. शशीकुमार मिना, अप्पर पोलीस आयुक्त, उत्तर प्रादेशिक विभाग, मा. श्री. महेश चिमटे पोलीस उपआयुक्त परिमंडळ १२, व मा. श्री. कैलास बर्वे, स.पो. आ. समतानगर विभाग, श्री. उमेश पाटील, प्र. वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली कुरार पोलीस ठाण्याचे मिसींग पथक अधिकारी म.स.पो.नि. श्रीमती. अनिता होडगे, मपोउनि. श्रीमती. कांताबाई बहुरे, पोह. श्री. सागर पवार (तांत्रिक मदत), पोशि. श्री. संदिप कोकणी, पोशि. श्री. अदित्य तुपे, मपोशि. श्रीमती. तृप्ती थोरात अश्या पोलीस पथकाने पार पाडली.

Editor

Head Editor- Mr. Aleem M. Inamdar Contact number - 9892615151 10 years experience in Journalism And 5 years experience in Digital Media

Related Posts

पंजीकृत फेरीवालों के लिए बीएमसी का बड़ा ऐलान, 26 जून तक कराएं सत्यापन

अलीम इनामदार, मुंबई, प्रतिनिधि। बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) ने मुंबई के सभी पंजीकृत पथ विक्रेताओं (फेरीवालों) के लिए महत्वपूर्ण सार्वजनिक सूचना जारी करते हुए उन्हें अपने आवेदन का सत्यापन करवाकर क्यूआर…

मुंबई में 10% जल कटौती की समीक्षा, बीएमसी ने अधिकारियों को दिए सख्त निर्देश

अलीम इनामदार, मुंबई, 12 जून: मुंबई में जारी 10 प्रतिशत जल कटौती के बीच बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) ने जल आपूर्ति व्यवस्था की व्यापक समीक्षा की है। अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (परियोजना)…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Missed

पंजीकृत फेरीवालों के लिए बीएमसी का बड़ा ऐलान, 26 जून तक कराएं सत्यापन

  • By Editor
  • June 13, 2026
  • 9 views

मुंबई में 10% जल कटौती की समीक्षा, बीएमसी ने अधिकारियों को दिए सख्त निर्देश

  • By Editor
  • June 12, 2026
  • 7 views

गोरेगांव के मृणालताई गोरे फ्लाईओवर पर बवाल, कल होगा रास्ता रोको आंदोलन

  • By Editor
  • June 11, 2026
  • 14 views

एसटी बस स्टैंड के 200 मीटर दायरे में अवैध यात्री परिवहन पर चलेगा विशेष अभियान

  • By Editor
  • June 9, 2026
  • 2 views

कुरार अप्पा पाड़ा में दिनदहाड़े चाकूबाजी, एक युवक की मौत, तीन लोग घायल

  • By Editor
  • June 7, 2026
  • 2 views

मालाड में दर्दनाक हादसा: BEST बस की चपेट में आने से 9 वर्षीय मासूम की मौत, परिवार में मातम

  • By Editor
  • May 30, 2026
  • 7 views