मुख्य सामग्री पर जाएं
Friday, 18 September 2026

25 नोव्हेंबर रोजी च्या” संविधान सन्मान ” सभेस उपस्थित राहण्याचे डॉ संजय नाकलगावकर यांचे आव्हान

माजलगाव, : प.पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारत देशाला २५ नोव्हेंबर रोजी संविधान दिले आणि २६ नोव्हेंबरला संविधान सभेत मांडण्यात आले. भारत देशाने ख-या…

Editor संवाददाता
November 24, 2025 1 मिनट की पढ़ाई 2 बार देखा गया

माजलगाव,

: प.पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारत देशाला २५ नोव्हेंबर रोजी संविधान दिले आणि २६ नोव्हेंबरला संविधान सभेत मांडण्यात आले. भारत देशाने ख-या अर्थाने लोकशाही स्वीकारली. समता, स्वतंत्रता, न्याय, हक्क, मताधिकार ह्या मूल्यांच्या आधारे आज भारत देश जगाचा आकर्षण केंद्र झाला. अनेक जाती, धर्म, पंथ, वेशभूष, भाषा, खान पान, विविधता असताना आज कित्येक वर्षे संविधानाने सर्वांना एक संघ ठेऊन जगण्याचं स्वातंत्र्य दिले.

पण देशातील एक समूह आज देशावर हावी झाला आहे तो स्वातंत्र्य मानायला तयार नाही तो लोकशाही मानायला तयार नाही, तो तिरंगा झेंडा मानायला तयार नाही, तो संविधान मानायला तयार नाही. मागील काही वर्षापासून ह्या समूहाशी आम्ही संघर्ष करत आहोत, लोकांच्या हिताचं संविधान ते बदलू पहात आहेत, संविधानात बदलाचं करून त्याची तोडामोड करून त्यांना अपेक्षित असलेली मनुवादी हुकूमशाही प्रमाणे सत्ता व संपत्ती भोगता येईल असे प्रयत्न चालू आहेत.

पण हे किती दिवस सहन करणार आपली येणारी पिडी सुरक्षित करायची असेल तर आपल्याला आत्ताच लढावं लागणार ना ! म्हणून ज्यांनी हे संविधान संविधान लिहलेले ते प. पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आणि राष्ट्रीय नेते बाळासाहेब आंबेडकर हे संविधान वाचवण्यासाठी संघर्ष करत आहेत, तुमचं आमचं आयुष्य सुरक्षित करण्यासाठी संघर्ष करत आहेत, त्यासाठी २५ नोव्हेंबर ला दादर शिवाजी पार्क वर संविधान सन्मान सभा आयोजित केलेली आहे ही सभा प्रचंड गर्दीने झाली पाहिजे आणि जो समूह संविधान बदलू पहात आहे त्याला इशारा दिला पाहिजे आम्ही संविधानाच्या बाजूने आहोत, आम्ही लोकशाही च्या बाजूने आहोत, आम्ही भारत देशाच्या बाजूने आहोत, आम्ही आरक्षणाच्या बाजूने आहोत, आम्ही आमच्या येणाऱ्या पिढील सुरक्षित करण्याच्या वाजूने आहोत.

म्हणून आपण सहपरिवार, मित्र, समाज, भारतीय बौद्ध महासभा, बौद्धजन पंचायत समिती, मराठा मोची, धनगर मोची, ओबीसी मोर्चा, संघटना, भावकी, मंडल, संविधान मानणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने, सर्वांनी शिवाजी पार्क संविधान सन्मान सभेस यावे असे आव्हान वंचित बहुजन आघाडी माजलगावचे मा तालुकाध्यक्ष डॉ संजय नाकलगावकर यांनी केले आहे

Editor

Head Editor- Mr. Aleem M. Inamdar Contact number - 9892615151 10 years experience in Journalism And 5 years experience in Digital Media

सभी लेख देखें

अपनी राय दें

Your email address will not be published. Required fields are marked *