मुख्य सामग्री पर जाएं
Friday, 18 September 2026

*खासदार रविंद्र वायकर यांच्या हस्ते आरेतील तब्बल १५ कोटी रुपयांच्या सुशोभिकरणाच्या कामांचे भूमिपूजन*

मुंबई (अलीम इनामदार ) आरेच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न करून महाराष्ट्रातील पर्यटक तसेच देश विदेशातील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी मुंबईचे फुफ्फुस अशी ओळख असलेल्या निर्सगरम्य…

Editor संवाददाता
November 27, 2025 1 मिनट की पढ़ाई 4 बार देखा गया

मुंबई (अलीम इनामदार )

आरेच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न करून महाराष्ट्रातील पर्यटक तसेच देश विदेशातील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी मुंबईचे फुफ्फुस अशी ओळख असलेल्या निर्सगरम्य आरेच्या विविध भागातील सौदर्यात अधिक भर घालण्यासाठी मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्राचे खासदार रविंद्र वायकर यांच्या हस्ते सोमवारी तब्बल सुमारे १५ कोटींच्या सुशोभिकरणाच्या कामांचे भूमिपूजन करण्यात आले. या सुशोभिकरणाच्या कामांमध्ये आरेतीलच एकूण ५ कामांचा समावेश आहे. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भूमिपूजन केलेल्या आरेतील ६७ कोटी रुपयांच्या अंतर्गत रस्त्यांच्या पूर्ण करण्यात आलेल्या काही रस्त्यांचे उद्घाटनही करण्यात आले.

या भूमिपूजन व उद्घाटनाच्या कार्यक्रमास आरेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिपूरकर, आरेच्या सार्वजनिक बांधकामाच्या कार्यकारी अभियंता प्रशाली दिघावकर, प्रियांका आंबोळकर, माजी नगरसेविका रेखा रामवंशी, मनीषा वायकर, दीप्ती वायकर-पोतनीस, शाखा प्रमुख बाळकृष्ण जोशी, राजन राणे, जनार्दन चव्हाण, क्षमा काळसेकर, सुरेखा गुटे, पूजा शिंदे, शिवसेनेचे अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते व रहिवासी उपस्थित होते.

आरेतील प्रसिद्ध अशा तलावात गेली अनेक वर्ष श्री गणेश मूर्ती व देवींच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात येत असे. परंतु हा तलाव सन २०२० रोजी वन विभागात गेल्याने याठिकाणी या सार्वांवर उच्च न्यायालयाने बंदी आणली. पर्यटकांना अधिक आकर्षित करण्यासाठी तसेच आरेच्या उत्पनात भर टाकण्यासाठी या तलावाचे सुशोभिकरण करून नवसंजीवनी देण्यासाठी विद्यमान खासदार रविंद्र वायकर आमदार असल्यापासून सातत्याने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच आरे प्रशासन, संबंधित विभागाचे मंत्री, सचिव यांच्याकडे पत्रव्यवहार तसेच बैठका घेऊन सातत्याने पाठपुरावा करत होते. त्यानुसार या तलावाच्या सुशोभीकरणासाठी जिल्हा नियोजन सामितिच्या माध्यमातून २०२३ मध्ये तब्बल रुपये १५ कोटी मंजूर करण्यात आले होते. परंतु या तलावाच्या सुशोभीकरणासाठी वनविभागाकडून परवानगी मिळत नसल्याने हा निधी परत न जाता आरेतील तसेच आरेत येणाऱ्या पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आरेतीलच अन्य भागांचे सुशोभिकरण करण्यासाठी वापरण्यात यावा, असा प्रस्ताव खासदार वायकर यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी यांच्याकडे आरेतील सार्वजनीक बांधकाम विभागाने पाठविला. त्याला जिल्हाधिकारी यांनी मंजुरी दिली होती.

त्यानुसार आरे दुग्धवसाह्तीतील आरे तलावाच्या लगत छोटा काश्मिर गार्डन येथे टप्पा -२ व टप्पा ३ ची सुधारणा व सुशोभिकरण, आरे दुग्धवसाह्तीतील वीर सावरकर उद्यान येथे सुधारणा व सुशोभीकरण, आरे दुग्धवसाह्तीतील न्यूझीलंड हॉस्टेल येथे सुधारणा व सुशोभिकरण, आरे दुग्धवसाह्तीतील गणेश तलावासमोरील भागाची सुधारणा व सुशोभिकारण करण्यात येणार आहे. त्याचा बरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भूमिपूजन केलेल्या तसेच खासदार यांच्या प्रयत्नामुळे आरेतील अंतर्गत रस्त्यांच्या कामांसाठी मंजूर करण्यासाठी आलेल्या ६७ कोटी रुपयांच्या कामांपैकी आदर्श नगर, युनिट नंबर ५ ते रॉयल पाम, युनिट नंबर ११ येथील लहान पुलाचे काम पूर्ण करण्यात आले असून त्यांचे उद्घाटन यावेळी करण्यात आले. हि सर्व कामे पूर्ण झाल्यानंतर आरेच्या सौदर्यात अधिक भर पडणार असून यामुळे पर्यटकांमुळे यात अधिक वाढ झाल्याशिवाय राहणारा नाही असा विश्वास वायकर यांनी यावेळी व्यक्त केला.

Editor

Head Editor- Mr. Aleem M. Inamdar Contact number - 9892615151 10 years experience in Journalism And 5 years experience in Digital Media

सभी लेख देखें

अपनी राय दें

Your email address will not be published. Required fields are marked *