मुख्य सामग्री पर जाएं
Friday, 18 September 2026

मुंबईत सायबर फसवणुकीचा मोठा भांडाफोड; 5 सिमकार्ड विक्रेत्यांवर गुन्हे दाखल

📍 मुंबई | अलीम इनामदार, सायबर गुन्हे शाखा, मुंबई यांनी सिमकार्डच्या माध्यमातून होत असलेल्या सायबर फसवणुकीविरोधात मोठी कारवाई करत 5 सिमकार्ड विक्रेत्यांवर गुन्हे दाखल…

Editor संवाददाता
March 22, 2026 1 मिनट की पढ़ाई 2 बार देखा गया

📍 मुंबई | अलीम इनामदार,

सायबर गुन्हे शाखा, मुंबई यांनी सिमकार्डच्या माध्यमातून होत असलेल्या सायबर फसवणुकीविरोधात मोठी कारवाई करत 5 सिमकार्ड विक्रेत्यांवर गुन्हे दाखल केले आहेत.

सायबर गुन्ह्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या मोबाईल क्रमांकांचा तपास करताना संबंधित क्रमांक कोणत्या एजंटमार्फत विकले गेले याचा शोध घेण्यात आला. त्यानंतर संबंधित एजंटांविरोधात सायबर पोलीस ठाणे, गुन्हे शाखा, मुंबई येथे एकूण 5 गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.

 

तपासात असे आढळून आले की, सिमकार्ड विक्रेते ग्राहकांच्या आधारकार्डचा गैरवापर करत होते. ग्राहकांनी एकच सिमकार्ड मागितले असताना त्यांच्या नावावर बनावट किंवा खोट्या पत्त्यांवर 2 किंवा अधिक सिमकार्ड सक्रिय करण्यात येत होते.

त्यापैकी एक सिम ग्राहकाला देऊन उर्वरित सिमकार्ड स्वतःकडे ठेवून ते सायबर गुन्हेगारांना पुरवले जात होते.

*नोंदवलेले गुन्हे आणि आरोपी*

1) मध्य विभाग सायबर पोलीस ठाणे (गु.र.क्र. 34/26)

कलमे: 318(4), 336(2), 336(3), 3(5) भा.न्या.सं. 2023 व कलम 66(D) IT Act

आरोपी:

मोहम्मद सुलतान मोहम्मद हनीफ अन्सारी (मदनपुरा, मुंबई)

झिशान कामले (नागपाडा, मुंबई)

2) दक्षिण विभाग सायबर पोलीस ठाणे (गु.र.क्र. 20/2026)

आरोपी:

दयाशंकर भगवान शुक्ला (राजेश कम्युनिकेश, कुलाबा)

3) पश्चिम विभाग सायबर पोलीस ठाणे (गु.र.क्र. 65/2026)

आरोपी:

श्रुष्टी प्रदीपकुमार बरनवाल (अंधेरी पश्चिम)

4) उत्तर विभाग सायबर पोलीस ठाणे (गु.र.क्र. 73/2026)

आरोपी:

निरज शिवराम पटवा (दहिसर)

5) पूर्व विभाग सायबर पोलीस ठाणे (गु.र.क्र. 51/2026)

आरोपी:

गौस मोहीउद्दीन मोहम्मद दस्तगीर (ITAS Mobile, ट्रॉम्बे)

 

ही कारवाई मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती, सह पोलीस आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम, अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उप आयुक्त (सायबर) पुरुषोत्तम कराड आणि सहाय्यक पोलीस आयुक्त इरफान शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

 

नागरिकांनी आपल्या नावावर किती सिमकार्ड सक्रिय आहेत याची खात्री करून घ्यावी. यासाठी Sanchar Saathi Portal या पोर्टलवर जाऊन “Know Mobile Connections in your name” या पर्यायाचा वापर करावा.

अज्ञात क्रमांक आढळल्यास “Not My Number” पर्यायावर क्लिक करून त्वरित तक्रार नोंदवावी.

Editor

Head Editor- Mr. Aleem M. Inamdar Contact number - 9892615151 10 years experience in Journalism And 5 years experience in Digital Media

सभी लेख देखें

अपनी राय दें

Your email address will not be published. Required fields are marked *