मुख्य सामग्री पर जाएं
Friday, 18 September 2026

पोलीस कर्मचाऱ्यांसाठी Aqua प्युरिफायर व वॉटर कूलर; संदीप जाधव यांचा पुढाकार, DCP महेश चिमटे यांच्या हस्ते उद्घाटन

अलीम इनामदार,मुंबई :   समाजसेवेचा उत्तम आदर्श घालत संदीप जाधव यांच्या राधे राधे फाउंडेशनच्या वतीने वनराई पोलीस स्टेशनमध्ये Aqua वॉटर प्युरिफायर आणि वॉटर कूलरची…

Editor संवाददाता
March 17, 2026 1 मिनट की पढ़ाई 5 बार देखा गया

अलीम इनामदार,मुंबई :

 

समाजसेवेचा उत्तम आदर्श घालत संदीप जाधव यांच्या राधे राधे फाउंडेशनच्या वतीने वनराई पोलीस स्टेशनमध्ये Aqua वॉटर प्युरिफायर आणि वॉटर कूलरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या उपक्रमाचे उद्घाटन डीसीपी श्री. महेश चिमटे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले. कार्यक्रमाला वनराई पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीश बने यांच्यासह सर्व पोलीस अधिकारी उपस्थित होते.

दिवसरात्र कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना स्वच्छ व थंड पिण्याचे पाणी सहज उपलब्ध व्हावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला आहे. या सुविधेमुळे पोलीस स्टेशनमधील कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

या स्तुत्य उपक्रमाबद्दल उपस्थित मान्यवरांनी राधे राधे फाउंडेशनचे कौतुक केले. समाजासाठी केलेला हा प्रयत्न भविष्यात अशा अनेक उपक्रमांना प्रेरणा देणारा ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

“स्वच्छ पाणी – निरोगी सेवा” हा संदेश देत सामाजिक बांधिलकी जपण्याचा हा एक प्रेरणादायी प्रयत्न ठरला आहे.

Editor

Head Editor- Mr. Aleem M. Inamdar Contact number - 9892615151 10 years experience in Journalism And 5 years experience in Digital Media

सभी लेख देखें

अपनी राय दें

Your email address will not be published. Required fields are marked *