मुख्य सामग्री पर जाएं
Friday, 18 September 2026

गोरेगावमध्ये राधे राधे फाउंडेशनतर्फे स्नेह-सेवा उपक्रम; केवळ १ रुपयांत ताज्या फळांचे व वेणीचे वितरण

  अलीम इनामदार (गोरेगाव), – मार्गशीर्ष महिन्याच्या पावन औचित्यावर राधे राधे फाउंडेशनतर्फे समाजासाठी विशेष स्नेह-सेवा उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक १७ डिसेंबर २०२५…

Editor संवाददाता
December 11, 2025 1 मिनट की पढ़ाई 2 बार देखा गया

 

अलीम इनामदार (गोरेगाव),

– मार्गशीर्ष महिन्याच्या पावन औचित्यावर राधे राधे फाउंडेशनतर्फे समाजासाठी विशेष स्नेह-सेवा उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक १७ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ४ वाजता होणाऱ्या या उपक्रमात नागरिकांसाठी केवळ १ रुपयांत पाच प्रकारची ताजी फळे तसेच सुंदर वेणी यांचे वितरण करण्यात येणार आहे.

 

“श्रद्धा तुमची… सेवा आमची” या भावनेतून राधे राधे फाउंडेशन अनेक सामाजिक उपक्रमांद्वारे स्थानिक नागरिकांपर्यंत मदतीचा हात पोहोचवत आहे. मार्गशीर्षाचा अध्यात्मिक आणि धार्मिक महिमा लक्षात घेऊन फाउंडेशनने सुरू केलेला हा उपक्रम समाजातील सर्वांना लाभदायी ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

 

या विशेष वितरण उपक्रमाचे स्थळ व्हाईट हाऊस, आसाराम बापू आश्रम शेजारी, जयप्रकाश नगर रोड क्रमांक १, गोरेगाव (पूर्व), मुंबई – 400063 असे आहे.

 

राधे राधे फाउंडेशनचे संस्थापक श्री. संदीप जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवला जाणार असून स्थानिक रहिवाशांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Editor

Head Editor- Mr. Aleem M. Inamdar Contact number - 9892615151 10 years experience in Journalism And 5 years experience in Digital Media

सभी लेख देखें

अपनी राय दें

Your email address will not be published. Required fields are marked *