गोरेगाव पश्चिम येथे “आम्ही साऱ्याजणी फाउंडेशन” आणि “राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संयुक्त विद्यामाने आयोजित भव्य दिवाळी ग्राहक पेठ उत्साहात पार पडली.
या प्रदर्शनात विविध उत्पादनांचे प्रदर्शन आणि विक्री करण्यात आली.
सदर ग्राहक पेठेला गोरेगाव पूर्व भाजपा महामंत्री संदीप जाधव यांनी भेट दिली.आम्ही साऱ्याजणी फाउंडेशन ला शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमात महिलांनी पारंपरिक वस्त्रप्रावरणे, दागिने, दिवाळी सजावट साहित्य, खाद्यपदार्थ अशा अनेक वस्तूंची विक्री करून आपल्या उद्योगाला प्रोत्साहन दिले. या एकदिवसीय बाजारपेठेत स्थानिक महिला उद्योजकांना मोठा प्रतिसाद मिळाला.
या उपक्रमाचा उद्देश महिलांना स्वावलंबनाचा मार्ग दाखवणे आणि लघुउद्योगांना प्रोत्साहन देणे हा होता.
गोरेगावमध्ये “आम्ही साऱ्याजणी फाउंडेशन” आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संयुक्त विद्यमाने भव्य दिवाळी ग्राहक पेठ आयोजित करण्यात आली. महिलांच्या उत्पादनांचे प्रदर्शन आणि विक्री झालेल्या या कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.