मुख्य सामग्री पर जाएं
Friday, 18 September 2026

गोरेगावात १ मे रोजी श्रावस्ती बुद्ध विहार सांस्कृतिक केंद्राचे भव्य उद्घाटन

मुंबई, गोरेगाव प्रतिनिधी : महाराष्ट्र दिन, कामगार दिन आणि बौद्ध पौर्णिमेचे औचित्य साधून गोरेगाव येथील श्रावस्ती बुद्ध विहार सांस्कृतिक केंद्राचे उद्घाटन १ मे रोजी…

Editor संवाददाता
April 30, 2026 1 मिनट की पढ़ाई 1 बार देखा गया

मुंबई, गोरेगाव प्रतिनिधी :

महाराष्ट्र दिन, कामगार दिन आणि बौद्ध पौर्णिमेचे औचित्य साधून गोरेगाव येथील श्रावस्ती बुद्ध विहार सांस्कृतिक केंद्राचे उद्घाटन १ मे रोजी मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. उत्तर-पश्चिम मुंबईचे खासदार रवींद्र वायकर साहेब

यांच्या हस्ते हा उद्घाटन सोहळा होणार असून, परिसरात याबाबत उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

सदर सांस्कृतिक केंद्राचे बांधकाम खासदार निधीतून पूर्ण करण्यात आले असून, या कामामुळे परिसरातील आंबेडकरी समाजात समाधान व्यक्त करण्यात येत आहे. सन १९७० पासून अस्तित्वात असलेल्या श्रावस्ती बुद्ध विहाराच्या विकासासाठी यापूर्वी अनेक सामाजिक व राजकीय नेत्यांनी आपापल्या स्तरावर योगदान दिले आहे.

 

विहार समितीने नेहमीच वास्तूची स्वच्छता व देखभाल जपली असून, अलीकडे शाखाप्रमुख स्वप्नील अनिल निरभवणे यांनी पुढाकार घेत विहाराच्या पुनर्बांधणीचे काम हाती घेतले. दहीहंडी उत्सवादरम्यान विहाराची स्थिती लक्षात घेऊन त्यांनी तत्काळ समितीशी चर्चा करत कामाला सुरुवात केली आणि अवघ्या एका वर्षात हे काम पूर्णत्वास नेले.

 

याबाबत विहाराचे जनरल सेक्रेटरी पी. एस. वानखडे यांनी सांगितले की, “१९७० पासून या विहारात सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रम सातत्याने राबवले जात आहेत. या ठिकाणाहून अनेक युवक-युवती घडून उच्च पदांवर पोहोचले आहेत.”

 

विहार परिसरात कोणत्याही प्रकारचे अवैध बांधकाम होऊ दिले नसून, परिसराची शिस्त आणि पवित्रता कायम राखण्यात आली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

 

दरम्यान, विहाराशी संलग्न संस्थेकडून महाराष्ट्र शासनाकडे सदर मैदान संस्थेच्या नावावर हस्तांतरित करण्याची मागणी करण्यात आली आहे, जेणेकरून भविष्यातील सामाजिक व शैक्षणिक उपक्रम अधिक प्रभावीपणे राबवता येतील

Editor

Head Editor- Mr. Aleem M. Inamdar Contact number - 9892615151 10 years experience in Journalism And 5 years experience in Digital Media

सभी लेख देखें

अपनी राय दें

Your email address will not be published. Required fields are marked *