मुख्य सामग्री पर जाएं
Friday, 18 September 2026

मुंबईकरांना दिलासा – ३ ते ४ डिसेंबरची पाणीकपात रद्द करण्याचा महापालिकेचा निर्णय

(अलीम इनामदार), मुंबई महानगरपालिकेकडून एक महत्त्वाचा निर्णय— १४ प्रशासकीय विभागांमधील प्रस्तावित १५% पाणीकपात रद्द करण्यात आली आहे.   भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण…

Editor संवाददाता
December 2, 2025 1 मिनट की पढ़ाई 7 बार देखा गया

(अलीम इनामदार),

मुंबई महानगरपालिकेकडून एक महत्त्वाचा निर्णय—

१४ प्रशासकीय विभागांमधील प्रस्तावित १५% पाणीकपात रद्द करण्यात आली आहे.

 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत मोठ्या संख्येने येणाऱ्या अनुयायांना कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

 

बुधवार, ३ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजेपासून ते गुरुवार, ४ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजेपर्यंत पाणीकपात करण्याचा प्रस्ताव होता. मात्र, विशेष परिस्थिती लक्षात घेऊन ही पाणीकपात पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे.

 

पाणीकपात रद्द झालेल्या १४ प्रशासकीय विभागांची यादी—

 

मुंबई शहर विभाग:

 

ए, सी, डी, जी दक्षिण, जी उत्तर

 

 

पूर्व उपनगरे:

 

एल विभाग

 

एस विभाग

 

 

पश्चिम उपनगरे:

 

एच पूर्व

 

एच पश्चिम

 

के पश्चिम

 

पी दक्षिण

 

पी उत्तर

 

आर दक्षिण

 

आर मध्य

 

 

महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत मोठ्या प्रमाणावर गर्दी अपेक्षित असल्याने नागरिकांना पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरतो.

Editor

Head Editor- Mr. Aleem M. Inamdar Contact number - 9892615151 10 years experience in Journalism And 5 years experience in Digital Media

सभी लेख देखें

अपनी राय दें

Your email address will not be published. Required fields are marked *