
अलीम इनामदार (मुंबई)
दि. २४/०४/२६ रोजी १५.३० वाजताच्या सुमारास बृहन्मुंबई महानगरपालिकेचे कामगार यांनी अंधेरी पोलीस ठाणेस फोनद्वारे कळविले की, ते ड्रेनेजची साफसफाई करत असताना मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडच्या मोकळ्या जागेजवळ बांधलेल्या कंपाउंड लगत असलेली बृहन्मुंबई महानगरपालिकेची ड्रेनेज लाईन, ओमनगर, मरोळ पाइपलाईन, अंधेरी पूर्व, मुंबई या ठिकाणी बंद मॅनहोलचे झाकण उघडले असता साधारण पाच ते सहा फूट खोल असलेल्या ड्रेनेज लाईनमध्ये कुजलेल्या अवस्थेत एक शव आढळून आले असल्याचे सांगितले. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस पथक हे तात्काळ घटनास्थळी रवाना करून पाहणी केली असता व नमूद घटनास्थळी एका महिलेचे शव हे पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत असल्याचे दिसून आले. सदर घटनेचे गांभीर्य ओळखून त्याबाबत अंधेरी पोलीस ठाणे अपमृत्यू क्र. २२/२०२६ अन्वये नोंद करण्यात आला. तसेच शवाची ओळख पटविण्याकरीता मा. वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे परिसरातील एकूण नऊ पोलीस पथके तयार करून परिसर परिघातील परिसर ०४,०९ व १० मधील पोलीस ठाणेस दाखल हरवलेल्या व्यक्तींची माहिती काढण्यात आली. मृतदेहावर मिळून आलेले दागिने व इतर ओळख पटविणाऱ्या बाबींच्या आधारे सदर महिलेची ओळख पटविली असता तिचे नाव क्लारा जोसेफ कोयेलो वय ६० वर्षे, रा. रूम नं. २०, आलोक चाळ, मरोळ पाइपलाईन, टेक्निकल एरिया, ए के रोड, अंधेरी पूर्व, मुंबई असे असल्याचे निष्पन्न झाले तसेच त्याबाबत दिनांक २०/०२/२०२६ रोजी सहार पोलीस ठाणे, मुंबई येथे हरविल्याची नोंद क्र. ०२/२०२६ अन्वये नोंद करण्यात आली असून त्याबाबत तक्रार ही तिचा भाऊ जोसेफ थॉमस कोयेलो यांनी दिली असल्याबाबत माहिती प्राप्त झाली. सदर मिळालेल्या माहितीच्या आधारे मृत महिला राहत असलेल्या परिसरात चौकशी केली असता मृत महिलेचे तिचा भाऊ जोसेफ थॉमस कोयेलो व त्याची बायको मारिया जोसेफ कोयेलो यांच्यामध्ये वारंवार भांडण होत असल्याचे तसेच मृत महिला हरविल्याच्या एक दिवस आधी म्हणजे दिनांक ०१/०२/२०२६ रोजी मृत महिला हिचे तिचा भाऊ जोसेफ कोयेलो व त्याची बायको मारिया कोयेलो यांच्याशी जोरदार भांडण झाले असल्याबाबत तसेच त्याच दिवसापासून मृत महिला ही गायब झाल्याची खात्रीशीर माहिती प्राप्त झाली. एकंदरित मिळालेल्या माहितीच्या आधारे मृत महिलेचा भाऊ जोसेफ थॉमस कोयेलो, त्याची बायको मारिया जोसेफ कोयेलो व मुलगा क्लेटन जोसेफ कोयेलो यांना चौकशीकरीता ताब्यात घेण्यात आले. त्यांचेकडे मानविय कौशल्याच्या आधारे तपास करण्यात आला असता जोसेफ थॉमस कोयेलो यांनी दि. ०१/०२/२०२६ रोजी रात्री ००.३० वाजताच्या सुमारास त्याच्या मृत बहिणीच्या वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून तिला जिवे ठार मारून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तिचे मृतदेह हा बंद मॅनहोलचे झाकण उघडून ड्रेनेज लाईनमध्ये टाकला असल्याचे व त्यानंतर त्याने व त्याची पत्नी मारिया कोयेलो यांनी कट करून सहार पोलीस ठाणे, मुंबई येथे मृत महिला ही हरविली असल्याबाबत खोटी तक्रार दिल्याचे निष्पन्न झाले. त्याअन्वये अपमृत्यू तपासी अधिकारी पोलीस उप निरीक्षक संजय अकोळकर यांनी सरकारी पक्षातर्फे फिर्याद दिल्यावरून अंधेरी पोलीस ठाणे गुन्हा नोंद क्रमांक ३६३/२०२६ कलम ३०२(इ), २०१(क), २९(ब), ३४ भा.दं.वि. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. तसेच सदर गुन्ह्यामध्ये जोसेफ व मारिया यांचा सहभाग निष्पन्न झाल्याने त्यांना नमूद गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली आहे.
अटक आरोपींची नावे व पत्ता
१) जोसेफ थॉमस कोयेलो वय ६५ वर्षे, रा. रूम नं. २०, आलोक चाळ, मरोळ पाइपलाईन, अंधेरी पूर्व, मुंबई
२) मारिया जोसेफ कोयेलो वय ६३ वर्षे, रा. रूम नं. २०, आलोक चाळ, मरोळ पाइपलाईन, अंधेरी पूर्व, मुंबई
तरी अत्यंत कुजलेल्या अवस्थेत मिळालेल्या अनोळखी महिलेच्या शवाची ओळख पटवून मागील तीन महिन्यापासून मिसिंग असलेल्या महिलेच्या खुनाचा गुन्हा उघड करण्याची उल्लेखनीय कामगिरी अंधेरी पोलीस ठाणे अधिकारी व अंमलदार यांनी पार पाडली आहे.
सदरची यशस्वी कामगिरी मा. पोलीस आयुक्त बृहन्मुंबई श्री देवेन भारती, मा. पोलीस सह आयुक्त (का व सु) श्री सत्यनारायण चौधरी, मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग श्री परमजित सिंह दहिया, मा. पोलीस उप आयुक्त श्री दत्ता नलावडे, परिमंडळ १०, मुंबई व मा. सहा. पोलीस आयुक्त गजानन पवार, अंधेरी विभाग यांचे मार्गदर्शनाखाली व पो.नि. श्री ओमेश मांडवकर, पो.नि. गुन्हे श्री विनोद पाटील यांच्या प्रत्यक्ष देखरेखीखाली सपोनि मगर, गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोउनि किशोर परकळे, पोउनि समाधान सुग, पोउनि संजय अकोळकर, स.पो. पेंडणेकर, पो.ह. शिंदे, पो.ह. गुजराती, पो.ह. कांबळे, पो.ह. मदळे, पो.ह. गायकवाड, पो.शि. पाटील, पो.शि. झांगे, पो.शि. लोंढे, पो.शि. माळी, पो.शि. शिंदे, पो.शि. पाटील, पो.शि. तिवाटे, पो.शि. टाकरे, पो.शि. दुले, पो.शि. नवघरे, पो.शि. मोरे, व पो.ह. विशाल पिसाळ (तांत्रिक मदत) यांनी पार पाडली आहे.