
प्रतिनिधी
गोरेगांव : राधे राधे फाउंडेशन आणि भारतीय जनता पार्टी यांच्या संयुक्त विद्यमाने दिवाळीच्या निमित्ताने “ सण आहे दिवाळीचा,एक हात मदतीचा” हा विशेष उपक्रम आयोजित करण्यात येणार आहे.
या उपक्रमांतर्गत गरजू नागरिकांना मोफत कीट वाटप करण्यात येणार आहे.
समाजातील प्रत्येक घटकाला आनंदाची दिवाळी साजरी करता यावी, यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
राधे राधे फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप जाधव यांच्या माहितीनुसार 2000 मोफत कीट देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले असून,
हा कार्यक्रम येणंाऱ्या १२ ऑक्टोबर २०२५ रोजी गोरेगांव पूर्व येथे आयोजित करण्यात आला असून,
नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.